नॅशनल हायस्कुलचा उत्कृष्ट निकाल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक नॅशनल हायस्कुलचा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या मंडळ परीक्षेचा निकाल८९.२७% इतका लागला आहे. परीक्षेला एकुण ५६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी ५०८उत्तीर्ण झाले आहे.
यामध्ये १२२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, १६० विद्यार्थी प्रथम श्रेणी, १४९ विद्यार्थीद्वितीय श्रेणी, ७७ विद्यार्थी तृतीय श्रेणी मध्ये यश संपादन केले आहे. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कु. तन्वी पुरुषोत्तम टिकार ५०० पैकी ४७७ गुण (९५.४०%) प्राप्त करुन पटकविला आहे.द्वितीय क्रमांक पियुष राजेश ताथोड याने ९३.४०%, तृतीय क्रमांक यश रितेश ढगे ९२.२०%, दर्शन भागवत लोणाग्रे ९२.२०%, यश विलास राऊत ९२.२०% प्राप्त केले आहे. यश विलास राऊत याविद्यार्थ्याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाने शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेच्याच प्राचार्या व सर्वशिक्षकवृंद यांचे अभिनंदन केले आहे. नॅशनल परिवाराच्या वतीने सर्व गुणवत्ताप्राप्त व यशस्वीविद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق