*मतदार यादी पुननिरिक्षण कार्यक्रम जाहीर*
खामगाव दि 16(उमाका) निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरिक्षणचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक २०/०७/२०२३ पर्यंत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे ऑनलाईन मतदार नोंदणीबाबत नविन सॉप्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना दयावयाचे आहे. केंद्रस्तरीय अधिकान्यामार्फत घरोघरी जावून मतदार प्रत्यक्ष पडताळणी दिनांक २१/०७/२०२३ ते २१/०८/२०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. यावेळी मतदारांनी मतदार यादीतील आपले नांव व फोटो व्यवस्थित असल्याची खात्री करुन घ्यावी मतदारांचे अस्पष्ट/खराब फोटो बदलणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण ही कार्यवाही दिनांक २२/०८/२०२३ ते २९/०९/२०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नाव समाविष्ट/वगळणी करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज निकाली काढण्यात येवून दिनांक ३०/०९/२०२३ ते १६/१०/२०२३ या कालावधीत मतदारांची पूर्ण यादी तयार करण्यात येणार आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी दिनांक १७/१०/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून याबाबत आक्षेप/ हरकती दाखल करण्यासाठी दिनांक १७/१०/२०२३ ते ३०/११/२०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त दावे/ हरकती दिनांक २६/१२/२०२३ रोजी पर्यंत निकाली काढावयाचे आहे. मतदार यादीची अंतीम प्रसिध्दी दिनांक ०५/०१/२०२३ रोजी संबंधीत मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे.
दिनांक ०१/०१/२०२४ रोजी जे मतदार वयाचे १८ वर्षे पुर्ण करणारअसतील त्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करीता आवश्यक पुराव्यासह नमुना ६ भरुन आपल्या संबंधीत बि.एल.ओ. कडे दयावे किंवा ऑनलाईन पध्दतीने http://www.nvsp.in या वेबसाईट वर किंवा Voter helpline या अँप च्या माध्यमातुन आपले नावाची मतदान नोंदणी करण्यात यावी असे आवाहन अतुल पाटोळे तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी २६ - खामगांव विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.
إرسال تعليق