Janopchar

 लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर  


    खामगाव ::-*  लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे पुण्यतिथी निमित्ताने 31 मे रोजी भव्य नेत्र तपासणी व  शस्त्रक्रिया शिबिर चे आयोजन शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॅम्पस येथे करण्यात आले आहे.


  महाराष्ट्र भाजप चे माजी प्रदेशाध्यक्ष , माजी  विधान परिषद विरोधी पक्षनेते , माजी कृषी मंत्री, लोकनेते स्व पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी 31 मे रोजी पुण्यतिथी आहे . या निमित्त शेगाव रोड वरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया  शिबीर  चे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांचे समाधीला अभिवादन केल्यानंतर आ अँड आकाश फुंडकर या शिबिराचे उदघाटन करणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत ये शिबिर राहणार आहे. या शिबिरात रुग्णांना तपासण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी राहणार असून या शिबिराचा नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم