आरपीएफ चे रंजन तेलंग यांच्या जाळ्यात पुन्हा दोन संशयित
शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ( 03.05.2023 ) :-आरपीएफ शेगाव चे प्रधान आरक्षक यांना विभागाने चोऱ्या रोखण्याची जबाबदारी सोपवली .आज ड्युटी चा पहिल्याच दिवशी रंजन तेलंग यांनी रेल्वे बुकिंग हॉल मध्ये सलग 3 तास पाळत ठेवत यात्रेकरु च्या सामानाची रेकी करणाऱ्या दोन संदिग्ध व्यक्ती ना ताब्यात घेतले कृष्णा सदाशिव उके, वय 44 वर्ष, रा. रसुलाबाद व विलास खंडारे वय 36 वर्ष राहणार देवळी ही दोघेही वर्धा जिल्ह्यातील आहे .ते बुकिंग कार्यालयात का आले याचे उत्तर देऊ शकले नाही. सदर व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना रेल्वे लोहमार्ग पोलिसांना स्वाधीन करण्यात आले .त्यावरून सदरील व्यक्तींवर कलम 109 Cr.PC अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची कार्यवाही करनीत आली
إرسال تعليق