किन्ही महादेव येथे संत सावता माळी सेवा मंडळातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी


किन्ही महादेव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती निमित्त माळी सेवा समाज युवा ग्रुप तसेच संत सावता माळी सेवा मंडळातर्फे किन्ही महादेव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माळी समाज युवा ग्रुप तर्फे संपूर्ण गावामधून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. तसेच जयंती दिनानिमित्त सेवा मंडळातर्फे भोजनाचे ही आयोजन करण्यात आले होते.


यावेळी उपस्थित ग्रा.पं. सदस्य गोपाल धानोरे माळी समाज युवा ग्रुप अध्यक्ष निलेश इंगळे उपाध्यक्ष रुपेश बोचरे तसेच अनिल बोचरे, अनंता तोडेकर,दिपक जुमडे, शिवराज इंगळे,श्याम धानोरे,रामक्रिष्णा राखोंडे,योगेश धानोरे, योगेश राखोंडे,भागवत राखोंडे,गोपाल बगाडे,जय राखोंडे इ. उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم