तिवसा येथे तालुका स्तरीय सामुदायिक प्रार्थना

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा ११४ वा ग्रामजयंती महोत्सव



अमरावती (जनोपचार न्यूज नेटवर्क)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा ११४ वा ग्रामजयंती महोत्सवा निमित्त रविवार दिनांक ३० एप्रिल स्थळ आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा येथे तालुका स्तरीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म सम्मेलनाचे आयोजन सांय ६ वाजता करण्यात आले आहे 

सकाळी १० ते २ या वेळेत भव्य आरोग्य तपासणी शिबीर या शिबिराला अमरावती जिल्ह्यातील तज्ञ नामांकित डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे रात्री ८ ते ९ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक प्रा.प्रेमकुमार बोके यांचे राष्ट्रसंतांचा धर्म आणि आजची परिस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यान रात्री ९ ते १० सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य युवा प्रबोधनकार डॉ रामपाल धारकर यांचे समाज प्रबोधनपर किर्तन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.यशोमतीताई ठाकुर आमदार तिवसा विधानसभा सर्व धर्माचें प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील शेकडो लोकांची उपस्थितती राहणार आहे, तेव्हा सदर कार्यक्रमात  जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचारमंच महाराष्ट्र राज्य च्या पदाधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم