जनोपचार द रियल न्यू

 "शेतकरी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा आज सकाळी ९.०० वाजता नारळ फुटणार" श्रीक्षेत्र अटाळी येथे शेतकरी परिवर्तन पॅनल चे सर्व उमेदवार उपस्थित राहणार


 खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) व मित्रपक्षाने एकत्र येऊन मजबूत असे "शेतकरी परिवर्तन पॅनल" उभे केले आहे. या पॅनलक्या प्रचाराचा नारळ खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत आज सकाळी ९.०० वा श्री विठ्ठल रुक्मिणी श्री संत भोजने महाराज संस्थान अटाळी येथे दणक्यात प्रचाराचा नारळ फुटणार आहे.


काल खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ची अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यामध्ये भारतीय जनता पार्टीने, शिवसेना शिंदे गट व मित्रपक्षांनी  ठरवून दिल्याप्रमाणे ज्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले व "शेतकरी परिवर्तन  पॅनल"  आज जाहीर झाले या सर्व उमेदवारांची आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.


खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत चुरस निर्माण झाली असताना, आमदार आकाश फुंडकर याच्या मार्गदर्शनात हे पॅनल उभे केले आहे. यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण वर्ग गटातून विलास त्रंबकराव काळे, सुदामसिंग दयालसिंग इंगळे, संतोष रामराव टाले, सुभाष काशिनाथ वाकुडकर, भास्कर विठ्ठलराव कोकरे, राजाराम अर्जुन काळणे, सुधीरराव गणेशराव देशमुख, तर सेवा सहकारी संस्था महिला वनमाला बळीराम भगत,  विद्याताई तेजराव टिकार, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग प्रवर्गातून रामकृष्ण श्रीराम भारसाकडे, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती मतदारसंघातून संतोष भास्कर हागारे, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून विनोद नरसिंगराव टिकार, चंद्रशेखर (लाला) दिगंबर महाले ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जातीतून ॲड.अविनाश भास्कर इंगळे ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटकातून कैलास श्रीकृष्ण बगाडे व्यापारी मतदारसंघातून भागवत किसन ठाकरे, संजय शितलदास भागदेवानी तर हमाल मापारी मतदारसंघातून नौरंगाबादी रमजान युसुफ यांचा समावेश आहे. या  शेतकरी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा नारळ आज दि.२१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र  संत भोजने महाराज संस्थान अटाळी येथे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तरी या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم