अपडेट जनोपचार

 रजत नगरी बायपासचे आमदार अँडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण!


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात संपूर्ण देशाचे तसेच राज्यातील विविध रस्त्यांचे आदरणीय केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात नूतनीकरण व चौपदरीकरनाचे काम सुरू आहे. यातील खामगाव शहराजवळून जाणाऱ्या *रजत नगरी* बायपासचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील अकोला नांदुरा दरम्यान खामगाव शहराजवळील बायपासचे काम नुकतेच पूर्ण झाले. या बायपासच्या कामाचे आज दि. 12 एप्रिल 2023 रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार  आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय  जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस संजय शिंनगारे, , विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राम मिश्रा,  आदींची उपस्थिती होती

Post a Comment

أحدث أقدم