भ.श्री. परशुराम जन्मोत्सवाची सभा सोत्साह संपन्न

खामगाव:-दरवर्षी प्रमाणे यंदाही दि. 22 एप्रिल रोजी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन त्यानिमित्य पुर्वतयारी करण्याच्या दृष्टीने दिनांक 08 एप्रिल रोजी स्थानिक मुक्तेश्वर आश्रम येथे भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. 


सभेच्या अध्यक्षस्थानी समाजाचे जेष्ठ मोहनलाल शर्मा व माधवराव जोशी होते. सभेमध्ये जन्मोत्सवानिमित्य राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा विषयी कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली. सर्वप्रथम श्यामसुंदर बोहरा यांचे हस्ते भ.परशुरामांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले व सभेला सुरुवात झाली. सभेत राजस्थानी ब्राह्मण भवन, महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा, परशुराम सेवा समिती, बहुभाषीक ब्राह्मण महासंघ,विप्र फाउण्डेशन, भ.श्री.परशुराम जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत दि.22 एप्रिल रोजी सकाळी ठिक 9 वा.भ.परशुराम व्यायाम शाळेत पुजन व आरती करुन स्कुटर रॅलीद्वारे शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापण करुन तसेच फरशी येथील गौ शाळेत गौ मातेस गौ ग्रास व पुजन करुन सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वितरण करण्यात येणार आहे. नंतर सायंकाळी 5 वा सत्यनारायण मंदिर येथुन पारंपारीक वाद्य,दिंडी,अश्व, उंट , विविध् झाकी व आकर्षक रथांसह भव्य शोभायात्रा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच जन्मोत्सवा निमित्य नियोजनाच्या आढावा बैठकीचे पुनच्च आयोजन महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा रायगड कॉलनी येथे दि. 15 एप्रिल रोजी सायं. 7 वा. ठेवण्यात आले आहे. 

तरी या आढावा बैठकीला व भ. परशुराम जन्मोत्सवानिमित्य आयोजीत सर्व कार्यक्रमांना समस्त ब्रह्म्वृंदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भ. श्री परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे। सभेचे संचालन आशिष सराफ, तर आभार प्रदर्शन राजेश राजोरे यांनी केले. 


Post a Comment

أحدث أقدم