27 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिर

 श्री. गजानन महाराज मंदीर, सरस्वती नगर, घाटपुरी रोड, येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-
पंचशिल होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगांव व श्री. गजानन महाराज मंदीर, सरस्वती नगर, यांचे वतीने 27 एप्रिल रोजी मोफत रोगनिदान व होमिओपॅथीक औषधोपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रुग्णांना आरोग्य विषयक माहीती व संधीवात,स्नायुवात, दमा, सर्दी, अॅलर्जी, वांग, बालदमा, टॉन्सील, फीट येणे, सोरायसीस, खान खरूज,कोड, लहान मुलांचे आजार, किडणीचे आजार, मुतखडा, चेह-यावरील डाग, नेहमी येणारा ताप,जंत, स्त्रियांचे मासीक पाळीतील आजार, केसांचे आजार, कॅन्सर इत्यादी आजारांवर होमिओपॅथीक औषधोपचार करण्यात येईल. गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच या शिबीरात नांव नोंदविलेल्या रुग्णांना पुढील ३ महीन्यांपर्यंत स्थानिक धर्मदाय पंचशिल होमिओपॅथीक रुग्णालय,आर्य समाज मंदीरा जवळ, बालाजी प्लॉट, खामगांव येथे मोफत होमिओपॅथीक औषधोपचारकरण्यात येईल. सोबत नोंदणी कार्ड आणणे बंधनकारक राहील.

,

Post a Comment

أحدث أقدم