पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजच्या वतीने Walkathon चे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय हे आपले बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय असुन गेल्या ६५ वर्षापासुन विविध शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहण्याचा महाविद्यालयाचा पायंडा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जागतिक लठ्ठपणा ) World Obesity Day) आणि महिला दिनाचे औचित्य साधुन पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजच्या वतीने खास
महिलांसाठी Walkathon (Your Step Towards Fitness ) स्पर्धेचे दि. ०५ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ मार्च २०२३ रोजी पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज, नाथ प्लॉट येथे सकाळी ५.१५ नांव नोंदणी, ५.४५ निष्ठा पुरवार यांचे वार्मअप डान्स (झुंबा) त्यानंतर सकाळी ६ वाजुन १५ मी. महाविद्यालयातुन Walkathon सुरू होवुन, जलंब नाका, नांदुरा रोड, गोकुळ नगर, मार्गे थेटे हॉस्पीटल, जलंब रोड, नाना-नानी पार्क, जलंब नाका व शेवटी पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज येथे समाप्त होईल. सहभागी स्पर्धेकांचे ३ वयोगट करण्यात आले आहे- गट अ - १८ ते ३० वर्ष, गट ब -३१ ते ५० वर्ष व गट क- ५१ वर्ष व पुढे. तीनही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कारदेण्यात येतील. ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे व निशुल्क आहे. तरी खामगांव शहरातील महिलांनी सदर स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा व या जनजागृती अभियानात आपला सहभाग द्यावा असे आवाहन पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ अजिंक्य कविश्वर यांनी केले आहे.
إرسال تعليق