व्यवसाईकांनी आपल्या प्रतिष्ठान समोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे- ठाणेदार पाटील
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शहर पोलीस स्टेशन चा पदभार घेतल्यानंतर ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला. विविध रस्त्यांवर लागलेले व्यवसायिकांचे बोर्ड रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काल पाटील यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.चोरीच्या व इतर घटनांना आळा घालण्यासाठी व्यवसायिकांनी आप आपल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे जेणेकरून घडलेल्या घटनेचा तपास लावने सोयीस्कर जाईल ,असे आवाहन काल शहर पोस्टेचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी केले. काल ३ मार्च रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात व्यापाऱ्यांशी बोलताना त्यांनी सदर आवाहन केले.
यावेळी लक्ष्मण शेठ आयलाणी, मुन्ना भाऊ पुरवार, शोहरतभाई, कृष्णा ठाकूर, रेहमान भाई, यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव उपस्थित होते. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी व्यवसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानचे बोर्ड रस्त्यात न लावता दुकानाच्या प्रिमायसेस मध्ये लावावे असे आवाहनही ठाणेदार पाटील यांनी यावेळी केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरीसारख्या घटनांना निश्चित आळा बसेल त्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
![]() |
Advt. |
إرسال تعليق