दिलखुलास अन् दिलदार व्यक्तिमत्व मनोज जाधव
समाजातील काही व्यक्तिमत्वही अशी असतात की, लांबून अंदाज बांधणे फार अवघड होते. मग उगाचच न बोलता एका शब्दाचाही संवाद न होता…जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. मनोज जाधव हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहे.11 मार्च रोजी यांचा वाढदिवस आहे. समाजकारण आणि पत्रकारितेचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.
निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच! छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,नेताजी सुभाषचंद्र बोस डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महान आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल मिळेल ती पुस्तके,खंड वाचनाची त्यांना आवड आहे.
चुकीचे वाटले तर जरुर समजावतील,सांगतील.एखाद्या क्षणी त्यांच्या पध्दतीने व्यक्तही होतील.परंतू मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. ‘मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती मनोज जाधव यांच्या जवळपासही नाही. त्यांचे व्यक्तिमत्व हे स्पष्ट आहे. कोणाबद्दलही मनात राग न ठेवता, राग न धरता संवाद साधणारे हे व्यक्तिमत्व आहे .
समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी,त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते. महाराष्ट्राच्या राजकिय,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारे हे व्यक्तिमत्व आहे. अशा या हरहुन्नरी,दिलखुलास,स्वच्छ मनाच्या मनोज जाधव यांना वाढदिवसाच्या पूर्वसंधीवर खुप खुप शुभेच्छा! 👍 प्रा.कपिल धोंगडे औरंगाबाद
Happy birthday dear friend Manoj 💐🎂
ردحذفإرسال تعليق