अ.भा. ग्रामीण पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
अमरावती :- आज दिनांक ८ मार्च २०२३ रोजी अमरावती येथील होटेल मनवार येथे अ.भा.ग्रामीण पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. अमरावती महानगर आयोजित अ. भा. ग्रामीण पत्रकार संघ महानगर शाखा आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष,युसुफ खान केंद्रिय उपाध्यक्ष, कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, जयश्री पंडागळे अध्यक्ष राज्य महिला मंच ,वर्षा गाडगे जिल्हाध्यक्ष,मिनल भटकर महिला मंच सरचिटणीस आदींची मंचकावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांचे फोटोला हारार्पण व दिपप्रज्वल करून सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यात अमरावती येथील अँड.किरण भुते उद्योजक, कांचन ऊल्हे सामाजिक कार्यकर्त्या, मनाली तायडे,शैक्षणिक क्षेत्रात कार्य, कविता बोंडे,महिला प्रश्नांसाठी लढा,उषा पानसरे महिला शिक्षीका, माया सापधारे महिला बचत गट, कापूसकर मॅडम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. अँड. राजेंद्र पांडे ,जयश्री पंडागळे ,माया सापधारे,कैलाश बापू देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ,मनोहर सुने केंद्रिय अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांनी केले.यावेळी कांचन ऊल्हे यांचे "उडाण" या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाला बाळासाहेब सोरगीवकर ,राजेंद्र भुरे,अशोक पवार,सागर सवळे,माणिक ठाकरे,मनोहर चरपे,मुन्ना जोशी,सुरेश ढवळे,अनिल साखरकर,राजीव शिवणकर,सुरेश मोरे,अशोक याऊल,अशोक वस्ताणी,इरफान खान,वर्षा काळमेघ,शिल्ला धावडे,वंदना तिडके,माया बासुंदे,माया वानखडे,वर्षा व्यवहारे,त्रिवेणी चेचरे,गंगा सुने,निर्मला सुने, हर्षा पाटील,विजय सौदागर ,शशिकांत कोल्हे, आशीष मिसाळकर ,आदी सर्व संघटनेचे केंद्रिय,महाराष्ट्र,अमरावती जिल्हा कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कांचन मुरके यांनी केले.आभार प्रदर्शन रविंद्र मेंढे यांनी केले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने.उपाध्यक्ष युसुफखान प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख यांनी यामरावती महानगर कार्यकारणीची घोषणा केली यात
राजेंद्र ठाकरे अध्यक्ष महानगर अमरावती,संतोष चव्हाण सचिव पदी,विजय सौदागर, शिवाजी तायडे उपाध्यक्ष,किशोर बरडे कोषाध्यक्ष,इरफान पठान सह कोषाध्यक्ष,शशिकांत कोल्हे सहसचिव,आशीष मिसाळकर संघटक,
कांचन मुरके महिला मंच अध्यक्ष महानगर,गंगा सुने उपाध्यक्ष, यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यासह विविध क्षेत्रातील बहुसंख्य महिलांची उपस्थीती होती.
إرسال تعليق