खामगाव
पंचायत राज समितीचे शिफारसीप्रमाणे पंचायत समिती, खामगाव ची सन २०२२-२३ ची वार्षीक आमसभा व सरपंच मेळावा मा. आमदार अॅड. श्री आकाशभाऊ फुंडकर, खामगाव विधानसभा मतदार संघ, खामगाव यांचे अध्यक्षतेखाली दि.३१ मार्च २०२३ रोजी ११ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय खामगाव येथे आयोजीत करण्यात आली आहे.
तरी तालुक्यातील सर्व सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सर्व खाते प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी आमसभेकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासक तथा गट विकास अधिकारी श्री चंदनसिंग एस राजपुत व सहाय्यक गट विकास अधिकारी श्री आर सी शेख पंचायत समिती, खामगाव यांनी केले आहे.
إرسال تعليق