किन्ही महादेव येथे सालाबादप्रमाणे यंदाही शिवपार्वती विवाह सोहळा तसेच भव्य यात्रा
जनोपचार न्यूज नेटवर्क
किन्ही महादेव:- किन्ही महादेव येथे वर्षानुवर्षे चालत आलेला शिवपार्वती विवाह सोहळा तसेच देवाधिदेव महादेव यांची यात्रा यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मागच्या दोन ते तीन वर्षात कोरोनामुळे या विवाह सोहळ्याला तसेच यात्रेला अनेक भाविकांना उपस्थित राहता आले नव्हते. या वर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे भाविकांना उपस्थित राहता येणार आहे.
![]() |
ADVT. |
दि.२९/०३/२०२३ रोजी रात्री ठीक १२:०१ मि. शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यात प्रमुख आकर्षण म्हणून घोडे तसेच होणारी आतिषबाजी प्रमुख ठरत असते. तसेच सर्व गावामधुन वाद्यासोबत भव्य मिरवणूक निघत असते. तसेच दि. ०२/०४/२०२३ रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व सोहळ्यात हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. क्षेत्र महादेव संस्थान तसेच किन्ही महादेव येथील ग्रामस्थांनी केले आहे.
إرسال تعليق