शिवकालीन मर्दानी खेळ ठरले विशेष आकर्षण

 सकल हिंदू समाज श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्साहात


खामगाव-   सकल हिंदू  समाज श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे   श्रीराम नवमी निमित्त  आयोजीत शोभायात्रा उत्साहात पार पडली. शोभयात्रेची सुरवात 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता येथील शिवाजी नगर स्टेडियम  मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण आणि मानाचा मुजरा करून करण्यात आली.


       सकल हिंदू समाजाचे एकत्रीकरण व्ह्यावे.या  उद्देशाने सदर धार्मिक शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले.ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून   अर्जुन जल मंदिर ,मेन रोड,रेल्वे स्टेशन रोड, नटराज गार्डन,अग्रेसन चौक, शहर पोलीस स्टेशन समोरुन, कोर्टापासून सातव पॉईंट सिव्हिल लाईन,केला नगर मध्ये पोहचून श्री प्रल्हाद महाराज श्रीराम मंदिर येथे महाआरती करून रात्री ठीक 10 वाजता समापन करण्यात आले.आयोजीत सकल हिंदू समाज श्रीराम नवमी शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने  हिंदूधर्मप्रेमी बांधवांनी उत्साहात सहभाग दर्शविला. शोभायात्रा सफल करण्यास एकनिष्ठा फाउंडेशन, युवा हिंदू प्रतिष्ठान,हिंदुराष्ट्र सेनेसह धर्म बंधूनी अथक परिश्रम घेतले.


शोभायात्रेचे मुख्य आकर्षण पंढरपूर येथील 

 मर्दानी खेळांचे प्रदर्शन ठरले असून यासह अश्वरथ मध्ये लहान मुलांनी साकारलेले  श्रीराम, सीता,लक्ष्मण,हनुमान जी चा जीवंत देखावा, बंजारा भजनी पथक, वारकरी भजनी दिंड्या टाळमृदंगाचा गजर आणि डी जे च्या श्रीरामाच्या भक्ती गीतावर भगवे ध्वज हातात घेऊन थिरकणाऱ्या तरुणाने उत्साहात भर पडली होती.

.



अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत भुसारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.



Post a Comment

أحدث أقدم