ठाणेदार शांतिकुमार पाटील यांनी खुर्ची काढली बाहेर!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क
शांतता व सुव्यवस्थेसाठी नवीन ठाणेदार आले की बदल होत असतो मात्र खामगाव येथील शहर पोस्टेचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी केबिनमध्ये बसणे टाळत *सब पर नजर सबकी खबर* ठेवणे सुरू केले आहे आता पाटील यांनी आपली खुर्ची व टेबल व्हरांड्यात ठेवला असून यामुळे ते सर्वांवर लक्ष ठेवणार आहेत.
शांतीकुमार पाटील यांनी पदभार घेतात वाहतुकीचा प्रश्न हा हाताळला .त्यानंतर लगेच वरली मटका सारखा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली. शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेला सूचना केल्या आहेत ठाणेदार पदाचा अभिमान न करता ग्राउंड लेव्हलवर त्यांनी काम सुरू केले असून प्रत्यक्ष वाहनातून शहरातील मुख्य रस्त्याचा गल्लीबोळाची माहिती स्वतः घेत आहेत शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती मात्र आता ही वाहतूक व्यवस्था शांतीकुमार पाटील कसे वठनीवर आणतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
إرسال تعليق