तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खामगावात 39 कारवाया

 

अन्न औषध प्रशासन जिल्हा रुग्णालय व स्थानिक पोलिसांची संयुक्तिक कारवाई


🛑नितेश मानकर 94 22 88 38 0 2🛑

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत काल खामगाव शहरात कोटपा सिगारेट व तंबाखू प्रतिबंध कायदा 2003 अन्वय 39 पान टपरी चालकांवर कलम 4 व 6 अ ब अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 10 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाणा डॉक्टर लता भोसले व अर्चना जाधव (जिल्हा सल्लागार )आराख ( सामाजिक कार्यकर्ता) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न व सुरक्षा अधिकारी वसावे व चालक देशमुख व खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पो.का. गणेश कोल्हे प्रमोद बावस्कार होमगार्ड श्रीनाथ या टीमने  जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संयुक्तरित्या कार्यवाही केली आहे


यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी पाटील व लोकल क्राईम ब्रँच प्रमुख लांडे व खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शहरातील एकूण  39 पान टपरी धारका कडून  10,800 रुपये दंड वसूल करण्यात आला

Post a Comment

أحدث أقدم