जिल्हा शल्यचिकित्सक यांना निलंबित करण्यात यावे - उमेश इंगळे



खामगांव - बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे राहनार अकोला महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना राज्य महासचिव यांनी आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिनांक 15 मार्च 2023 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकार सुरज यादव यांनी केलेल्या डॉक्टराविरोधात तक्रारी वर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.दोषी डॉक्टर हे रुग्णसेवक तथा  सुरज यादव यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असुन खोट्या तक्रारी देऊन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा हे सदर डॉक्टरला पाठीशी घालत आहेत म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाईन दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे


Post a Comment

أحدث أقدم