परमात्म्याचा अवतरण दिवस, दिव्य अलौकिक जन्मोत्सव या रूपाने ब्रह्माकुमारीजमध्ये साजरा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव :-स्थानीय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रायगड कॉलनी येथे महाशिवरात्री महोत्सव महाशिवरात्रीला सकाळी साजरा करण्यात आला. आपण सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता हा एकच आहे, तो परमात्मा शिव आहे. शिव परमात्मा नवीन सृष्टीच्या म्हणजे सत्युगाच्या निर्मितीसाठी या सृष्टीवर ८७ वर्षांपूर्वी अवतरीत झाला असून ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून राज योगाचा अभ्यास करून घेऊन मनुष्य आत्म्याला दैवी गुणांनी परिपूर्ण करून नवीन युगाची तयारी करत आहे, असा संदेश सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यांनी यावेळी दिला.
महाशिवरात्री हा शिव परमात्म्याचा अवतरण दिवस, दिव्य अलौकिक जन्मोत्सव या रूपाने ब्रह्माकुमारीजमध्ये साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ईश्वरी महावाक्याचे श्रवण नंतर शिवबाबांना भोग लावण्यात आला.
शेवटी निराकार परमात्म्याचे स्मृतीचिन्ह असलेला ध्वज आदरणीय शकुंतलादीदी, सुषमा दीदी, दिव्यादीदी यांच्याहस्ते फडकविण्यात आला व शेवटी सर्वांनी परमात्मा ध्वजाखाली ईश्वरीय मर्यादेमध्ये स्वतःला संकल्पबद्ध केले. मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारीज परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
إرسال تعليق