लोकनेते स्‍व.माणिकरावजी गावंडे यांच्‍या समाधीवर अनेक मान्‍यवर झाले नतमस्‍तक

 जावई प्रा अनिल अमलकार व नितीन मेटांगे यांनी विद्यार्थ्यांसाठी जाहीर केले बक्षीस

खामगाव ःः(नितेश मानकर) जनोपचार न्यूज नेटवर्क :-राजकारणातील व समाजकारणातील अजातशत्रु असे लोकसेवा करणारे लोकनेते दिवंगत माजी आमदार माणिकरावजी गावंडे यांच्‍या स्‍मृती समाधी सोहळ्याप्रसंगी अनेक मान्‍यवरांसह अनेकांची उपस्‍थित होती.


 ११ फेब्रुवारी २३ रोजी ११ वाजता खामगाव तालुक्‍यातील बोथा काजी येथे लोकनेते स्‍व. माणिकरावजी गावंडे यांच्‍या स्‍मृतीदिनानिमित्‍त त्‍यांच्‍या समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजकीय, सामाजिक सह अनेक क्षेत्रातील मान्‍यवर माणिकरावजींच्‍या समाधीवर नतमस्‍तक झाले. यावेळी मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमारजी सानंदा, दादासाहेब कविश्वर, वंचितचे जिल्‍हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, अण्णासाहेब देशमुख, अरुण ठाकरे, राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील, मनसेचे विठ्ठल लोखंडकार, डॉ. सदानंदजी इंगळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, लालाभाऊ महल्‍ले अशोक भिसे, किशोरआप्‍पा भाेसले, संभाजीराव टाले, यांच्‍यासह अनेकांनी या स्‍मृतीसोहळ्यानिमित्‍त स्‍व. माणिकरावजी गावंडे यांच्‍या कार्याबद्दल गौरवोद्‍गार काढले. 


माणिकरावजी हे राजकारणातील एक प्रभावशाली व्‍यक्‍तीमत्‍व असून, त्‍यांचे माझे चांगले संबंध होते. त्‍यांच्‍यामुळे मी राजकारणात पुढे आलो आहे.  ते सर्वधर्म समभाव विचाराचे आमच्‍या कॉंग्रेस पक्षाचे आधारस्‍तंभ होते, असे मत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी व्‍यक्‍त केले. तर वंचितचे जिल्‍हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी बोलतांना सांगितले की, मुर्ती लहान पण किर्ती महान असे माणिकरावजी होते. स्‍व.माणिकरावजीं सारखे व्‍यक्‍तीमत्‍व राजकारणात होणे नाही.  यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांनी त्‍यांनी व्‍यक्‍तीमत्‍वाचे पैलु उलगडले. 


   याप्रसंगी माणिकरावजी गावंडे यांचे जावई प्रा.अनिलजी अमलकार यांनी स्‍व. माणिकरावजी यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ दरवर्षी गरजवंत पाच विद्यार्थ्यांना आयटीआयचे शिक्षण हे मोफत देण्याचे सुध्दा जाहीर केले. तर धाकटे जावई इंजि.नितीनजी मेटांगे यांनी बोथाकाजी येथील जिल्‍हा परिषद शाळेतील वर्ग दहावा व वर्ग बारावा यातील प्रथम आलेल्‍या विद्यार्थ्याला प्रत्‍येकी पाच, पाच हजाराचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक पंजाबरावजी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाला मान्‍यवरांसह अनेकांची तसेच गावंडे परिवार व त्‍यांच्‍या नातेवाईकांची उपस्‍थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم