चालक - वाहक सरळ सेवा भरती 2019 मधील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या अन्यथा आमरण उपोषण

 


पात्र उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक,  विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभाग बुलडाणा यांना निवेदन व इशारा

निवेदन देताना


बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क-: चालक तथा वाहक सरळ सेवा भरती २०१९ मधील पात्र उमेदवारांना तत्काळ प्रशिक्षण देवून नियुक्ती देण्यात यावी अन्यथा 20 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी वजा इशारा पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय मुंबई  यांच्यासह जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा,  विभाग नियंत्रक, रा.प. महामंडळ विभाग बुलढाणा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,कार्यालयाने 2019 मधे बुलडाणा जिल्ह्यातील चालक तथा वाहक पदाकरीता जाहिरात क्र. 1/2019  नुसार 472 चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या संदर्भात  प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवून कार्यपद्धतीने सर्व निवडीचे निकष लावून बुलढाणा विभागाची  चालक तथा वाहक अंतिम निवड यादी जाहीर केली. पात्र उमेदवारांपैकी  138 उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षण ही पूर्ण करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे मात्र उर्वरित उमेदवारांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नाही.त्यामुळे या उमेदवारांनी आझाद मैदान येथे उपोषण केले होते तेव्हा  आश्वासन देवून नियुक्ती देण्यात येईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार उर्वरित पात्र उमदेवारांपैकी 60 उमेदवारांची पुन्हा वैद्यकिय तपासणी पूर्ण करण्यात आली तर वैद्यकिय चाचणी पूर्ण केल्यानंतर 60 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येणार होते मात्र  उमेदवारांची दोन वेळा वैद्यकिय चाचणी होवून सुध्दा अद्यापही प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले नाही. गेल्या 2019 पासून पात्र उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने पात्र उमेदवार व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .त्यामुळे सर्व वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेवून तत्काळ जिल्ह्यातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  जर लवकरात लवकर पात्र उमेदवारांचे प्रशिक्षण घेवून तत्काळ नियुक्ती न दिल्यास 20 फेब्रुवारी पासून सर्व उमेदवार आमरण उपोषण करण्याच्या इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री, व्यवस्थापकिय संचालक, मध्यवर्तीय कार्यलय, रा.प.मुंबई., उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्र.०३ रा.प.नागपुर,  महाव्यवस्थापक नियंत्रण समिती, रा.प.अमरावती, आमदार विधानसभा बुलडाणा, जिल्हाधिकारीबुलडाणा, जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, बुलडाणा, निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी मुन्ना बेंडवाल मधुकर शिंगारे, योगेश भोकरे, सचिन गवई, नीलेश लंबे, अक्षय पाचपोर,सुशील नगारे  यांच्यासह उमेदवार उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم