एन टी देशमुख यांच्या विजयलक्ष्मी पेट्रोलियमला 2022 चा अवॉर्ड
![]() |
मुंबई येथे अवार्ड स्वीकारताना अजिंक्य देशमुख |
(जनोपचार नितेश मानकर) खामगाव दि.९:- येथील एनटी बाप्पू देशमुख यांच्या विजय लक्ष्मी पेट्रोलियमला 2022 अवार्ड मिळाला आहे . मनमाड टेरिटरी या विभागाकडून पेट्रोल चॅम्पियन,डोअर टु डोअर डिझेल विक्री चॅम्पियन,सर्वात जास्त ऑईल विक्री चॅम्पियन आणि पेट्रोल व डिझेल चॅम्पियन असे चार (अवॉर्ड) ग्राहकास सर्व सुविधा दिल्याने विजयलक्ष्मी पेट्रोलियमला मिळाल्याबद्दल एन टी बाप्पु देशमुख व त्यांचे चिंरजीव अजिंक्य देशमुख यांचा कंपनीकडून मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विजयलक्ष्मी पेट्रोलियम मध्ये चांगल्या प्रकारची सुविधा मिळत असल्याने ग्राहकांचा कल वाढलेला आहे. दर्जेदार डिझेल व पेट्रोल मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल, पेट्रोलची विक्री होत असल्याने कंपनीकडून त्यांना 2022 चा अवार्ड दिला आहे. हा यावर्षीचा मानाचा अवार्ड आहे हे विशेष!
إرسال تعليق