इथे दिल्या जाते गरजूंना रक्त

 गरजू रुग्णांना वेळेवर रक्त देणारे खामगावचे सामान्य रुग्णालय

वर्षभरात ३ हजार २४६ रक्त पिशव्यांचे संकलन


खामगाव (जनोपचार न्यूज) रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते.रक्तदानाचे महत्व सर्वसामान्यांनाआता कळू लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथील सामान्यरुग्णालयात, शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात वबुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तसंकलन केंद्र आहे. यापैकी खामगाव येथील शासकीयरुग्णालयातील रक्त संकलन केंद्र मोठे मानले जाते. कारण या केंद्रातून रुग्णांसाठी रक्ताची अधिक प्रमाणात मागणी असते. एवढेच नव्हे खामगाव शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येतात. याशिविरातील रक्त संकलनासाठी सामान्य रुग्णालयाचे रक्त केंद्रातील अधिकार्‍यांना पाचारण करण्यात येते. वाढदिवसानिमितत रक्तदान करणायांकडून रक्तदान शिबिरातून अधिक प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. यामुळे या रक्तदान केंद्रात रक्ताची कमतरता भासत नाही. गरजू रुग्णाला जेव्हा रक्ताची आवश्यकता असतेत्या वेळेस रक्ताच्या पिशव्या येथीलसामान्य रुग्णालयातून उपलब्धकरुन देण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण ३ हजार २४६ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.



या रुग्णालयात खामगावसह नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, मलकापूर, जळगाव जामोद येथील रुग्णांसह प्रसुतीसाठी महिला येथे मोठ्या प्रमाणात भरती होत असतात. एवढेच नव्हे तर शहराबाहेरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ गेला आहे. या मागांवर अपघातांच्या घटना घडतात. अपघातातील बहुतांश लोक हे येथील सामान्य रुग्णालयात येतात. त्यांना पण रक्ताची गरज भासते. सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्त केंद्रातील रक्त देण्यात येते. सन २०२२ मध्ये ३ हजार २४६ रक्त पिशव्या जमा झाल्या. संकलित करण्यात आलेल्या पिशव्यांपैकी १ हजार ७२३ पिशव्या या एकूण ४३ रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलित करण्यात आल्या. रुग्णालयाच्या रक्त केंद्रात १ हजार ४२८ पिशव्या संकलित करण्यात आल्या. त्यामध्ये १ हजार ४४३ पुरुष व दोन महिलांचा समावेशअसल्याची माहिती येथील सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमन अधिकारी डॉ. प्रणाली देशमुख यांनी दिली. या रक्त केंद्रात रक्तदान केलेल्या त्या व्यक्तीच्या रक्ताची एचआयव्ही, गुप्त रोग, मलेरीया, पांढरा व पिवळा कावीळ अशा पाच प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा येथील सामान्य रुग्णालयात आहे. या पाच चाचण्यांचा अहवाल निल आल्यानंतरच ते रक्त गरजू रुग्णांना देण्यात येते. रक्त खराब होऊ नये यासाठी प्रिâज आहे. संकलित केलेल्या रक्त पिशव्यांपैकी ३५ पिशव्या सिकलसेल, ६२ पिशव्या अमेनीया रुग्णांना देण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्णालय व नर्सिंग होमला २७५ गरोदर माता व अपघातातील रुग्णांना ९९९ व १७२३ पिशव्या या नियोजित व अत्यंत आवश्यक रुग्णांना देण्यात आल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत जमा झालेल्या पिशव्या अशा- जानेवारीत २७२, फेब्रुवारी ३०२,

मार्च १९६ एप्रिल ३२९, मे ४३३ जून २८८ जुलै १८०, ऑगस्ट ३८८, सप्टेंबर २१७, ऑक्टोबर २३१ नोव्हेंबर १७७ व डिसेंबर महिन्यात २७७ अशा एकूण ३ हजार २४६

रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या असल्याची माहिती येथील रक्तपेढी विभागातील वरीष्ठ रक्तपेढी वैज्ञानिक सुरेंद्र छाजेड यांनी दिली.

प्रत्येकाने रक्तदान करावे

प्रत्येक व्यक्तीने आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करावे. या रक्तदानाने एखाद्याने प्राण सुध्दा वाचू शकतात. शहरातील सामाजिक संघटना, संस्था व सामाजिक कार्य करणार्‍या क्लब यांनी वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. या शिबिराच्या माध्यमातून व लोकांनी स्वच्छेने केलेल्या रक्तदानातून आपण जीव वाचवू शकतोसंकलित झालेले रक्त गरजू रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार देण्यात येत आहे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी सांगितले



Post a Comment

أحدث أقدم