आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे "सप्तरंग" स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
खामगाव( नितेश मानकर ):- स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ या लोकप्रिय शाळेचे स्नेहसंमेलन मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अत्यंत सुंदर पद्धतीने यशस्वीरित्या पार पडले. प्ले ग्रुप ते केजी 2 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सकाळी पार पडले तर पहिली ते पुढील वर्गाचे स्नेहसंमेलन दुपारी पार पडले. दोन्ही कार्यक्रमाला शाळेच्या विद्यार्थ्यांची तसेच पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
शाळेचे स्नेहसंमेलन हे "सप्तरंग" "रेनबो" या थीमवर आधारित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्याचे रंग उधळून उपस्थित प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेतले व टाळ्या मिळविल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉटन किंग म्हणून ओळखल्या जाणारे श्री चंदू भाऊ मोहता हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ रजनी देवी मोहता व विनोद सुपर शॉप चे मालक श्री विनोद डिडवानिया हे होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री के आर राजपूत, सचिव श्री जितेंद्र सिंह चव्हाण, श्री गौतम मुनोद, श्री जितेंद्र जैन, श्री गणेश म्हात्रे, सौ संगीता चव्हाण, श्री कवीश्वर सिंह राजपूत यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने माता सरस्वती, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज व शाळेच्या संस्थापिका स्वर्गीय सौ विजयाबाई राजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन व मालर्पण करून झाली. संस्थेचे सचिव श्री जितेंद्रसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक पर भाषण केले. प्रमुख पाहुणे श्री विनोद डिडवानिया यांनी आदर्श शाळा ही 2002 पासून निरंतर विद्यादानाचे कार्य तसेच स्नेहसंमेलना सारखे विविध नवीन उपक्रम घेण्यात अग्रेसर असते त्यामुळेच आदर्श शाळेच्या नावाप्रमाणेच सर्व गुण संपन्न आदर्श विद्यार्थी आपणास भविष्यात दिसतील. असे प्रतिपादन त्यांनी उपस्थितांसमोर केले.
अध्यक्षीय भाषणात चंदू मोहता यांनी सरस्वतीच्या मंदिराजवळ निरंतर आदर्श ज्ञानपीठ चे विद्यादानाचे कार्य सुरू आहे आणि या शैक्षणिक कामासाठी मी सदैव तयार राहील असे प्रतिपादन केले.
सकाळच्या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ प्रियंका राजपूत व सौ कस्तुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सरदेशमुख यांनी केले. दुपारच्या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ संगीता चव्हाण व सौ अश्विनी देशमुख तर आभारप्रदर्शन सौ पातुरकर यांनी केले. सकाळच्या स्नेहसंमेलनात कोविड काळामुळे प्रथमच मोठ्या स्नेहसंमेलनाच्या मंचावर येत सुंदर नृत्य प्रदर्शित केले आणि उपस्थित मान्यवर तसेच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आपल्या पाल्याला पहिल्यांदाच मंचावर नृत्य करीत पाहून पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नृत्याद्वारे सप्तरंग स्नेहसंमेलनास सार्थक ठरवले. दुपारच्या सत्रात पहिली पासून पुढच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला पूर्वीचा मंचावरचा अनुभव वापरत खूप सुंदर असे नृत्य सादर केले आणि प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या मिळवीत *हम भी किसीसे कम नही* या उक्तीप्रमाणे सादरीकरण केले. स्नेहसंमेलनात दैवत छत्रपती, एकदंताय ,ये देश है वीर जवानों का, राजे आले राजे आले आणि झुमका झुमका वाली पोर या गाण्यावरील नृत्य उपस्थित प्रेक्षकांची वाह वाह मिळवून गेले. प्ले ग्रुप चे विद्यार्थी जंगल जंगल बात चली है या गाण्यावर वाघ, हत्ती, जिराफ, सिंह इत्यादी बनून येत उपस्थित प्रेक्षकांचे मन मोहून गेले. तसेच सकाळच्या सत्रातील वेड लावलंय, स्टाईल मेरा साउथ वाले हिरो जैसा, गोमू संगतीनं, बुरूम मुरूम, हवा हवाई आणि कुडी नु नचने दे या गाण्यावरील नृत्य उपस्थित प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेले.
प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत ओलंपियाड या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले 17 गोल्ड मेडल तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळविलेले पारितोषिक तसेच बक्षिसे देण्यात आली.
दोन्ही सत्रातील स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेश वंदनेने झाली तर शेवट पसायदानाने झाला. आनंदी वातावरणात सर्व प्रेक्षकवर्ग तल्लीन झाले होते आणि घरी परत जातांना आपल्या सोबत स्नेहसंमेलनाच्या आनंदी व मंत्रमुग्ध करणाऱ्या आठवणी घेऊन गेले.
स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य सौ पळसकर, पर्यवेक्षिका सौ राजपूत, सौ महाजन, सौ वैराळे, कु उगले, सौ अश्विनी देशमुख, सौ कस्तुरे, सौ विजया पोकळे, सौ पातुरकर, कु चोपडे, सौ वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ गायत्री पोकळे, कु प्रतीक्षा साबळे, सौ कोमल आकणकर, श्रीमती सपना हजारे, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ राजकन्या वडोदे, सौ प्रतिभा गावंडे आदींनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق