क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा संपन्न -

 

     चि . ऋतुराज वसंत गाडेकर याच्या वाढदिवसानिमित्त विजेत्यांना विविध पुस्तकांची बक्षिसरुपी सप्रेम भेट -



     खामगाव :-  जि . प . हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी भाषण व गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . सदर स्पर्धेत उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चि . ऋतुराज वसंत गाडेकर याच्या वाढदिवसानिमित्त इंग्रजी व्याकरण , डिक्शनरी , सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते बक्षीस रुपी भेट देऊन कौतुक करण्यात आले .

     यात वर्ग ८ ते १० या गटातून कु. कोमल विनायक वायाळ ९ अ प्रथम , कु . प्रतिक्षा रमेश गाडे ८ अ व्दीतीय , कु . साक्षी सरदार १० अ तृतीय , कु . नम्रता जाधव ८ अ चवथा , कु . प्रियंका हरणे ८ अ चवथा , तेजस मगर १० अ पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे . 



५ ते ७ गटातून कु .वैष्णवी हरणे ६ अ प्रथम, कु .पायल येळवंडे ६ अ  द्वितीय व सिद्धी गाडे ७ अ हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे .

गायन स्पर्धेत कु . अक्षरा अंगद वाकडे ६ अ प्रथम , कु . प्रगती तांबट ६ अ व्दीतीय , कु . श्रद्धा थेटे ७ अ तृतीय तर ८ ते १० गटातून कु . साक्षी तांबट ९ अ प्रथम , कु . पायल गिरी १० अ व्दीतीय , कु . राधीका तांबट ८ अ तृतीय क्रमांक मिळविला आहे .

   तसेच वर्ग १० ब मधील कु . नेहा येळवंडे व वर्ग ८ अ ची कु . प्रणाली लहाने यांना प्रोत्साहनपर बक्षिस मिळाले आहे .



तर या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन कु . प्रतिक्षा रमेश नवघरे , कु . पायल कणखर , कु . प्राची पवार , कु .श्रृती डोळस यांनी केल्याबददल बक्षिसांच्या मानकरी ठरल्या असून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .याप्रसंगी प्राचार्य एल . एच . सरोदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माध्यमिक शिक्षक संघाचे  जिल्हाध्यक्ष  वसंतराव गाडेकर गुरुजी, श्री . डी . एस . वायाळ , रामनंदन केदार , अविनाश घुगे , प्रा . शेळके , प्रा . वांजोळ , गजानन गोसावी , समाधान खरात , सौ . नेवारे , श्री . डहाळे सर  , श्री . सुर्वे सर  प्रामुख्याने उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم