खामगाव (जनोपचार न्यूज):- प्रेस क्लब खामगाव रजि नं महा 329/19 एफ 18432 च्या वतीने उद्या 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्य स्थानीय कोल्हटकर स्मारक मंदिर येथे दु. 3 वा. विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात जिल्हा भूषण पुरस्कार श्रीमंत शिवाजीराव देशमुख, गौरव पुरस्कार डॉ.गौरव गोयनका, उद्योग पुरस्कार सतीश राठी, कार्य गौरव पुरस्कार सौ. राजकुमारी तेजेन्द्रसिंह चव्हाण, स्व.बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भुषण पुरस्कार राहुल पहुरकर, स्व. गोवर्धनसेठ गोयनका स्मृती प्रित्यर्थ विशेष पुरस्कार योगाचार्य कल्याण गलांडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाशदादा फुंडकर, बुलढाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड स.चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे, हभप प्रकाश महाराज मोरखडे, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल म्हस्के यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास पत्रकार बांधव, व्यापारी तथा नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, सचिव ईश्वरसिंह ठाकुर यांनी केले आहे
إرسال تعليق