खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क
विश्वव्यापी सर्वोत्तम सेवाभावी लॉयन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत स्थानिक शाखा लॉयन्स क्लब
खामगांव मागील ४७ वर्षापासून विविध सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात व खामगांव परिसरात
कार्यरत आहे. दरवर्षी लॉयन्स क्लब खामगांवच्या वतीने भव्य व्यापार, कृषी, व्यंजन व मनोरंजन प्रदर्शनी
लॉयन्स एक्स्पो चे आयोजन करण्यात येते. यावर्षी १० व्या लॉयन्स एक्स्पो २०२३ चे आयोजन स्थानिक
शासकीय तंत्रनिकेतन मैदान, जलंब रोड खामगांव येथे दि. २५ जाने ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान
आयोजन करण्यात आले आहे.
![]() |
उद्या रविवारी डॉक्टर गोंदणे खामगावात |
संपर्क नितेश मानकर ८२०८८१९४३८ )
या लॉयन्स एक्स्पो चा फित कापून भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी
अत्यंत उत्साहात लॉयन्स चे माजी आंतरराष्ट्रीय डायरेक्टर एमजेएफ लॉ.डॉ. नवल मालु (औरंगाबाद) व भारत
सरकारच्या केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष व बुलडाणा जिल्ह्याचे खासदार मा. श्री. प्रतापराव
जाधव यांचे हस्ते व खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. श्री. आकाशदादा फुंडकर तसेच विशेष
अतिथी म्हणून लॉयन्सचे प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लॉ. सुनील देसरडा, प्रसिद्ध उद्योजक श्री. संतोष
डिडवाणीया, लॉयन्सचे माजी प्रांतपाल एमजेएफ लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर लॉयन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष एमजेएफ लॉ. महेश चांडक, एक्स्पो
चेअरपर्सन लॉ. तुषार कमानी, क्लब सचिव लॉ. पिनेश कमानी, एक्स्पो कनवेनर लॉ. राजेंद्र नाहार, एक्स्पो
सचिव लॉ. शंकर परदेशी, एक्स्पो व क्लब कोषाध्यक्ष लॉ श्रमिक जैस्वाल, लॉयन्स क्लब सर्व्हिस ट्रस्ट चे
अध्यक्ष लॉ रमेश भुतडा, एक्स्पो चे माजी चेअरपर्सन लॉ. अशोक केला, एमजेएफ लॉ दिनेश गांधी, लॉ डॉ.
परमेश्वर चव्हाण, एमजेएफ लॉ किशोर गरड, लॉ अशोक सपकाळ, लॉ डॉ संजीव राठोड, लिओ अध्यक्ष सागर
आवतरामाणी उपस्थित होते.
लॉयन्स संस्थेचे संस्थापक मेल्वीन जॉन्स यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन व मान्यवरांचे हस्ते दीप
प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटकांच्या हस्ते फीत कापून विधीवत लॉयन्स एक्स्पो
२०२३ चे शानदार उद्घाटन करण्यात आले. एक्स्पो चेअरपर्सन लॉ तुषार कमानी यांनी स्वागतपर भाषण
केले. माजी प्रांतपाल लॉ डॉ अशोक बावस्कर प्रास्ताविकात लॉयन्स एक्स्पो आयोजनामागील उद्देश सांगताना
या कार्यक्रमातून संकलीत निधी हा लॉयन्स क्लब खामगांव व्दारा संचालित लॉयन्स आय हॉस्पिटल साठी
वापरला जातो हे सांगून लॉयन्स आय हॉस्पिटल व्दारा आजपर्यंत हजारो रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया व नेत्ररोग
निदान व उपचार झाल्याचे सांगितले. आमदार अॅड. श्री. आकाशदादा फुंडकर यांनी लॉयन्स एक्स्पो चे कौतुक
करताना लॉयन्स क्लबच्या कोणत्याही कामासाठी सहकार्य करण्यास सदैव तत्पर असल्याचे सांगितले. मा.
खासदार श्री. प्रतापरावजी जाधव यांनी या वेळी उद्घाटनपर भाषणात बोलताना सांगितले की खामगांव
सारख्या छोट्या शहरात सुद्धा इतके सुंदर आयोजन तेही निरंतर दहा वर्षे लॉयन्स क्लब व्दारे होत असल्यामुळेलॉयन्स क्लब ही संस्था नक्कीच कौतुकास पात्र आहे. लॉयन्स क्लब खामगावंच्या होऊ घातलेल्या भव्य लॉयन्स
आय हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उप प्रांतपाल लॉ सुनील देसरडा
आणि उद्घाटक लॉ डॉ. नवल मालू यांनीही खामगांव लॉयन्स क्लबच्या विविध सेवा प्रकल्प व लॉयन्स एक्स्पो
२०२३ चे भरभरून कौतुक केले. लॉयन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून खामगावातील प्रस्तावित
लॉयन्स आय हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी सांगितले तसेच अशा प्रकारचे आयोजन
प्रांतामधील जास्तीत जास्त लॉयन्स क्लब द्वारे करण्यात यावे अशी इच्छा प्रकट केली.
सोमवार दि. ३० जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या लॉयन्स एक्स्पो मध्ये उद्योजक व व्यावसायिकांसाठी
कमर्शियल झोन, बालगोपालांसाठी अॅम्युझमेंट झोन व परिवारातील वेगवेगळ्या खवय्यांसाठी फुड झोन, युवक
युवतीसांना विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून
त्याचा लाभ खामगांवकर जनतेने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वेतीने करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमात लॉ पिनेश कमानी यांनी ध्वजवंदना तर आभार प्रदर्शन लॉ शंकर परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन लॉ डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी केले. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. या
कार्यक्रमास लॉयन्स क्लब तथा लिओ क्लब खामगांवचे सर्व सदस्य, खामगांव नगरीतील गणमान्य नागरीक,
पत्रकार बांधव तसेच लॉयन्स एक्स्पोमधील व्यावसायीक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे लॉयन्स
क्लबचे प्रसिध्दी प्रमुख लॉ.डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी कळविले आहे.
إرسال تعليق