जनोपचार न्यूज नेटवर्क
खामगाव:- २३ जानेवारी २०२३ रोजी खामगांव अर्बन को-ऑप. बँक लि., खामगांवच्या जानेफळ शाखेचे नुतन
वास्तुमध्ये स्थानांतरण व ग्राहक स्नेहमिलन सोहळा आयोजित केला असता, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे मा. अध्यक्ष
श्री. आशिष चौबिसा होते, तर उद्घाटक म्हणून सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. श्री. विवेकजी जुगादे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे विभाग संघचालक मा. श्री. चित्तरंजनदासजी राठी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून
रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह मा. श्री. राजेंद्रजी उमाळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविक बँकेचे मा. मुख्य कार्यकारी
अधिकारी श्री. सुधीर कुळकर्णी यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. विवेक जुगादे यांनी आपले मनोगत व्यक्त
करतांना म्हणाले की, बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार या उक्तीप्रमाणे साधी राहणी, उच्च
विचारसरणी असलेल्या संचालकांच्या हातात खामगांव अर्बन बँक सुरक्षित आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेला अपेक्षीत सर्व
मापदंडात बसणारी खामगांव अर्बन बँक सहकार क्षेत्रातील एक आदर्श बँक आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते
मा.श्री.चित्तरंजनदास राठी म्हणाले की, अंत्योदयाचे पालन करणारी खामगांव अर्बन बँक तळागळातील लोकांना सुध्दा
अर्थसहाय्य करते व खऱ्या अर्थाने दिन-दुबळ्यांची सेवा करणारी बँक म्हणजे खामगांव अर्बन बँक होय. फक्त नफा कमविणे
हा उद्देश न ठेवता अनेक सामाजीक उपक्रमात बँक सातत्याने सक्रिय असते. तर मा. श्री. राजेंद्रजी उमाळे यांनी कोणत्याही
संस्थेच्या प्रगतीत त्रिसुत्री असणे आवश्यक आहे ती त्रिसुत्री म्हणजे सेवा, समृध्दी आणि समरसता या तीन्ही बाबी खामगांव
अर्बन बँक परिवाराने जोपासल्या आहेत. म्हणून बँक सर्व सामान्य ग्राहकांना तसेच उद्योगपतींना सुध्दा आपलीशी वाटते अशी
भावना व्यक्त केली. आणि अध्यक्षीय भाषणामध्ये बँकेचे मा. अध्यक्ष श्री. आशिष चौबिसा आपले मनोगत व्यक्त करतांना
म्हणाले की, वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी खामगांव येथे आयोजीत करण्यात येत असते. परंतू सर्व शाखेचे मा. सभासद
या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकत नसल्याने गेल्या नऊ वर्षांच्या आपल्या कार्यकाळाची प्रगती बाबत सविस्तर
माहिती विशद केली. सन २०१४ मध्ये असलेले भाग भांडवल रु.२२.३२ कोटीहून ३१ मार्च २०२२ ला रु.२९.५६
कोटी झाले आहे. तर रिझर्व फंड रु.५०.४९ कोटीहून रु. १७४.४५ कोटी झाले आहे. एकूण ठेवी रु.५५९.८५ कोटीहून
रु. १०६४.४३ कोटी झाले असून, एकूण कर्जे रु. ३३८.४० कोटीहून रु.५७३.८६ कोटी झालेले आहे. बँकेचा एकूण
व्यवसाय रु.८९८.२५ कोटीहून रु.१५७२.३५ कोटी एवढा झाला आहे. तसेच प्रती कर्मचारी व्यवसाय सुध्दा रु.२.३८
कोटीहून रु.४.६२ कोटी झाला आहे. आपल्या कार्यकाळात मुख्य कार्यालयासह एकूण १० शाखांचे नुतणीकरण व नुतन
वास्तुमध्ये स्थानांतरण करुन ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक सेवा दिली आहे. यामध्ये RTGS,
NEFT, IMPS तसेच UPI अॅपद्वारे ग्राहकांना सेवा देणारी विदर्भातील एकमेव सहकारी बँक म्हणून ख्याती मिळविली आहे.
बँकेचे एकूण १० ATM द्वारे सुध्दा चांगल्या प्रकारची सेवा देऊन मा. सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक यांचेसोबत
‘नातं विश्वासाचं’ कायम ठेवले आहे. गेल्या ११ वर्षांपासून बँकेस सतत ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झाले असून, आतापर्यंत
बँकेला विदर्भस्तरीय सलग सहा वर्षे प्रथम तर राज्यस्तरावरील एकूण पाच पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ही सर्व उपलब्धी
आम्ही मा. संचालक मंडळाच्या योग्य नियोजनबध्द धोरणाद्वारे कर्मचारी वर्गाचे अथक परीश्रम व आपल्या सहकार्यामुळेच
साध्य करु शकलो याचा आम्हांस अभिमान आहे.
-
सदर कार्यक्रमात बँकेचे मा. उपाध्यक्ष श्री नरेंद्र करेसिया, मा. संचालक श्री. मोहनराव कुळकर्णी, मा. संचालिका
सौ. विजयाताई राठी, श्रीमती सुचेताताई हातेकर, श्रीमती संतोषताई झुनझुनवाला, सौ. फुलवंतीताई कोरडे, मा. संचालक
श्री. सुधीर मुळे, मा. श्री. सचिन पाटील, मा. श्री. राजेंद्रसिंह राजपुत यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमात जानेफळ
परिसरातील मा.सभासद, ठेवीदार, खातेदार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री. शेखर
कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे मा. संचालक श्री. मोहनराव कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता
जानेफळ शाखेचे शाखाधिकारी श्री मुक्तेश्वर जहागीरदार व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र
गीताने झाली.
إرسال تعليق