उद्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार
धुळे:- जनोपचार न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र पोलीस पदक गुणवान सेवा निमित्ताने धुळे येथील पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला असून उद्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बारकुंड ,प्राचार्य विजय पवार पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात येणार आहे .पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
पोलीस निरीक्षक पवार यांच्या बद्दल जनोपाचार ने घेतलेली माहिती:- 👑रामकृष्ण नारायण पवार शिक्षण- बीकॉम ,गाव - पाटण ता. शिंदखेडा जिल्हा धुळे,येथील राहणारे आहेत 👑 पोलीस उपनिरीक्षक 1998,1999 महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून नेमणूक झाली महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे मूलभूत प्रशिक्षण दरम्यान 347 पोलीस उपनिरीक्षक मध्ये सर्वप्रथम सोर्ड ऑफ ऑनर पुरस्कार प्राप्त 👑प्रथम नेमणूक - गडचिरोली जिल्हा भामरागड तालुका पोलीस पथक धोडराज गावी ब्लास्ट मध्ये गेल्यावर तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीरिष कुमार जैन ,अपर पोलीस अधीक्षक राजा बाबु स्टालिन,sdpo भामरागड पुरूषोत्तम कराड मार्गदर्शन मध्ये without wall compound post open केली ,विशेष अभियान पथक ( c - 60) अहेरी ,कुरखेडा पथकात काम करून नक्षल अभिमान राबवले नक्षल चकमक केल्या 👑बुलडाणा जिल्हा संवेदनशील पोलीस स्टेशन शिवाजी नगर 2007 जातीय दंगल झाली असताना जिल्हा पोलीस अधीक्षक देशभ्रतार ,रविंद शिसवे ,लखमी गौतम ,शामराव दिघावकर आदेशाने काम करून जातीय दंगलीस आळा घातला 👑जळगाव जिल्हा संवेदनशील चोपडा शहर पोलीस ठाणे,जिल्हापेठ,मुक्ताई नगर ,जातपडताळणी बुलढाणा, पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे अंतरवर्ग प्रशिक्षक 21-6-2021 धुळे ptc येथे.
إرسال تعليق