परभाव दिसत असल्याने विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - प्रा.डॉ. अमलकार
![]() |
खामगाव : वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्याबाबतचे चुकीचे वक्तव्य करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वजा तक्रार वंचित बहुजन आघाडीचे अमरावती पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा.डॉ.अनिल अमलकार यांनी शहर पोलिस स्टेशनला केली आहे. तक्रारीमध्ये नमुद आहे की, अमरावती पदवीधर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रा.डॉ.अनिल अमलकार हे निवडणुक लढवीत आहेत. आमच्या पक्षाचा इतर कुठल्याही उमेदवाराला पाठींबा नाही आणि असण्याचा प्रश्नही नाही. परंतु राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलतांना वंचितच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीची आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून संबंधीतांवर त्वरीत योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा तसा जाहीर खुलासा त्यांनी करून सदरहु वक्तव्य केल्याबाबत माफी मागावी, तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोस्टेला तक्रार देताना प्रा.अनिल अमलकार यांच्यासोबत वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, शेगाव तालुका अध्यक्ष दादाराव वानखडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.अनिल अमलकार भरघोस मतांनी निवडून येतील - गणेशभाऊ चौकसे
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विजय पक्का असून पराभवाच्या भितीमुळे विरोधी पक्षातील नेते संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.डॉ.अनिल अमलकार यांना अमरावती पदवीधर मतदार संघात मिळणारा जनाधार, विविध संघटनांचा पाठींबा, पदवीधरांचा कौल पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना डोळ्यासमोर पराभव दिसत आहे. महाविकास आघाडी व राष्ट्रवादीचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. मात्र पदवीधर मतदार हे सुज्ञ असून अशा वक्तव्यांचा कोणताही परिणाम या निवडणुकीवर होणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा कोणालाही पाठींबा नसून वंचितचे अधिकृत उमेदवार असलेले प्रा.अमलकार हे भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचे मत वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी व्यक्त केले आहे.
إرسال تعليق