जनोपचार न्यूज नेटवर्क
खामगाव:- सजनपुरी येथे श्रीराम बहुउद्देशीय सांस्कृतिक व क्रीडा मंडळ सजनपुरी यांच्या वतीने 20 जानेवारी 2023 रोजी निशुल्क आरोग्य शिबीर घेण्यात आले प्रमुख उपस्थिती सजनपुरी गावाचे उपसरपंच सौ सुमिता राऊत सौ सुधाताई सात पुतळे समाजसेवक शेषराव सातपुतळे आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर अतुल बढे खामगाव यांनी सेवा दिली नर्स संध्या साबळे रोशनी थोरात सागर लव्हाळे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी ब्लडप्रेशर शुगर तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले औषध गोळ्या वितरित केल्या शिबिरात एकूण 130 महिला पुरुष बालक यांनी लाभ घेतला आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरिता संस्था अध्यक्ष श्री शेषराव सात पुतळे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन सौ सुधाताई सातपुतळे यांनी केले
إرسال تعليق