खामगव ( जनोपचार) :- अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीने महावितरण कंपनीचा कार्यक्षेत्र असलेल्या भांडुप परिमंडळातील ठाणे व वाशी मंडळ समांतर वीज वितरणाचा परवाना विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेला आहे.
त्या विरोधात महाराष्ट्राच्या वीज उद्योगात कार्यरत असलेल्या ३० संघटनांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते अधिकारी संघर्ष समितीची स्थापना करून राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांना देण्यात आलेल्या नोटीस नुसार आज खामगाव विभागीय कार्यालय समोर महाराष्ट्र स्टेंट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन च्या वतीने कॉ सी एन देशमुख कार्याध्यक्ष, व एन वाय देशमुख झोनल सचिव अकोला तर सब ओर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन कडून शैलेश आखरे, राष्टीय काँगेस इंटक कडून संतोष गीते, भारतीय मजदूर महासंख बी एम एस कडून पंकज जैन, स्वतंत्र मजदूर संघटन मागासवर्गीय कडून प्रमोद हेलोडे राज्य उपाध्यक्ष यांनी उपस्थित कामगार यांना मार्गदर्शन केले.
إرسال تعليق