खामगाव प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे हे खामगाव ते भीमा कोरेगाव पदयात्रा करीत असताना त्यांनी २४ डिसेंबर रोजी वाळूज येथील साखळी उपोषणाला भेट दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नगर रोड वाळूज च्या विरोधात 20 डिसेंबर पासून विविध मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषण मंडपाला गणेशभाऊ चौकसे यांनी भेट दिली व मागण्यांची माहिती घेतली
यावेळी उपोषण कर्त्याच्या मागण्या रास्त असून या मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी केली. यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर वडगाव जिल्हा संभाजीनगर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांन येथे पंढरीनाथाचे दर्शन घेऊन निघाले. तर गंगापूर फाट्यावर अँड. शिराळे व त्यांचे वडील तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड यांनी गणेशभाऊ चौकसे व बोथाकाजीचे माजी सरपंच अविनाश हिवराळे वंचित कार्यकर्ते प्रमोद जावडेकर यांचा शाल पुष्प देऊन सत्कार केला. श्री क्षेत्र देवगड येथे दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू झाला.l फोटो - वाळूज येथे साखळी उपोषणाला भेट देताना गणेश चौकसे
إرسال تعليق