आता खामगाव तालुक्याच्या कार्यालयात होतील कामे?

 नागरिकांची पुरवठा विभागातील कामे होतील वेळेवर ! संबधित अधिकाऱ्याला देतील समज! 

तहसीलदार अतुल पाटोळे यांचे आश्वासन l  भाजपा युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडीच्या निवेदन व आंदोलनाची दखल l



 खामगाव जनोपचार :  तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात सुरू असलेला मनमानी कारभार थांबून संबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा व भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आमदार ऍड.आकाशभाऊ फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अतुल पाटोळे यांनी भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची ८ डिसेंबर रोजी बैठक घेऊन नागरिकांची पुरवठा विभागातील कामे वेळेवर होणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे सदर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे.      भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद होते की, अन्नपुरवठा विभागात मनमानी कारभार सुरू आहे. सदर विभागात रुजू असलेले वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही त्यामुळे सदर विभागामार्फत नवीन तयार होणारे राशन कार्ड व इतर तयार होणारे राशन कार्ड नागरिकांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे राशन कार्ड ची गरज असणाऱ्या  विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहेत तसेच इतर नागरिकांनाही राशन कार्डचा उपयोग असताना त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच  राशन दुकानावर संबंधित अधिकारी यांचे द्वारा वेळेवर योग्य तो अन्नपुरवठा होत नाही त्यामुळे राशन कार्ड धारकांना वेळेवर अन्न मिळत नसल्याने त्यांची त्यांच्यावर उपसमारीची वेळ आलेली आहे. पुरवठा विभागात नागरिकांची वेळेवर काम होत नाही. निरीक्षण अधिकारी विशाल भगत यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यांचे वर योग्य ती कारवाई करावी याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडी भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा २८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. सदर आंदोलनाची दखल घेत ८ डिसेंबर रोजी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पुरवठा विभागातील होणाऱ्या कामाची योग्य ती चौकशी करण्यात येईल. तसेच विभागामार्फत नवीन तयार होणारे रेशन कार्ड फेरफार करून राशन कार्डधारकांना वेळेवर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करण्यात येईल यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांना धान्य हे द्वारपाच योजनेअंतर्गत पुरविण्यात येत असते त्याबाबत संबंधितांना सूचना देऊन स्वस्त धान्य दुकानदारांना वेळेवर धान्य पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे आश्वसन तहसीलदार अतूल पाटोळे यांनी दिले. या आश्वासना मुळे   सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, रोहन जयस्वाल, जिल्हा संयोजक सोशल मीडिया आशीष सुरेका, एडवोकेट दिनेश वाधवाणी, योगेश आळशी उमेश ढोण उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم