अहमदाबाद (जनोपचार न्यूज): पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज, ३०
डिसेंबर रोजी निधन झाले. मंगळवारी त्यांना
रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून
ही माहिती देण्यात आली. आज पहाटे साडेतीन च्या
सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही
दिवसांआधी हिराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस झाला
होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची भेट
घेतली होती. ट्विटर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "त्या"
शेवटच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
إرسال تعليق