हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
ऍड आरिफ शेख यांनी केला होता युक्तिवाद!
खामगाव :- पिं. राजा पोस्टे मध्ये पंडीत चव्हाण अधिक एक यांच्या विरुद्ध २७ जुन २०१४ रोजी भादंवि कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाअंती येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान सरकारी अधिवक्ता यांनी ९ साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षाचे वकील अॅड. आरीफ शेख यांनी उलटतपासणी केली. यावेळी अॅड. आरिफ शेख यांनी मृतकाच्या मृत्युपूर्व जबानीवर मुंबई हायकोर्टाच्या सन २०२२ चा न्यायनिर्वाळा दाखल केला असता न्यायालयाने त्याला ग्राह्य धरून संशयाचा लाभ देऊन आरोपींना २९ डिसेंबर २२ रोजी आरोपातून दोषमुक्त केले. याप्रकरणात अड.आरिफ शेख यांना अँड उबेद शेख यांनीसहकार्य केले, अशी माहिती एकाप्रसिध्दीपत्राद्वारे दिली आहे.
إرسال تعليق