विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.
जनोपचार न्यूज:- वाई येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था ही वाई तालुक्यांमध्ये कार्यरत असून कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र आहे संस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली असून संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवले जातात त्याच पद्धतीने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.
यावर्षी देखील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ४५० लोकांनी संस्थेला पुरस्कारासंदर्भात प्रस्ताव पाठवले होते परंतु संस्थेच्या वतीने यावर्षी एकूण 60 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले ज्या मध्ये खामगांव येथील गायक सिनेअभिनेते महेंद्र सावंग यांना राज्यस्थरीय कला गौरव पुरस्कार देऊन सन्माणीत करण्यात आले संस्थेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती प्रशासकीय अधिकारी मा. शंकरराव गायकवाड सर (वाई पोलिस स्टे),कृष्णराज पवार सर (वाई पोलिस स्टेशन) चे अधिकारी उपस्थित होते. सुयोग बेलोसे सर (समाजसेवक)नितीन कदम सर (दिशा पब्लिक स्कूल वाई), सोपान कोचळे, संदीप जाधव, भारत खामकर.. इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यासोबत संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत कोचळे सर उपाध्यक्ष नितीन वरखडे सर कार्याध्यक्ष गिरीश धोंडे सर पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल सर हे देखील उपस्थित होते सन्मानार्थि पुरस्कृत मान्यवर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून उपस्थित होते. कार्यक्रम सोहळ्यासाठी वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता सामाजिक शैक्षणिक कृषी विज्ञान क्रीडा तसेच सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील लोकांना विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
إرسال تعليق