दारूबंदी विभागाची जळगाव जामोद तालुक्यात कारवाई

 


एका महिलेसह पुरुषाकडून 95 हजाराचा मुद्देमाल जप्त



खामगाव जनोपचार:- न्यूज खामगाव दारूबंदी विभागाकडून अवैध दारू पकडण्याचा सपाटा सुरू असून आज दिनांक 22 12 2022 रोजी मा. उपायुक्त श्री विजय चिंचाळकर साहेब अमरावती मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनगाव.जामोद.  ता.जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे  दारूबंदी गुन्हया कामी छापा मारला असता तेथे मोहा सडवा रसायन 3155 लीटर . हातभट्टी दारू 180 लीटर .देशी दारू 6.84  लीटर मिळूनआली असेच गावठी दारू गाळण्याचे इतर सामान असा एकूण 95735 रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी नामे सुमित्राबाई ठाकूर राधाबाई बोबडे राहणार सुनगाव . आबेदा बी  शेख रईस . मनसब का रशीद खा  रा जामोद आरोपी इसमाचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलमानुसार  गुन्हा नोंद करून सदरील आरोपींना अटक करण्यात आली  सदरील कारवाई श्री आर के फुसे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव .श्री एन के मावळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शेगाव जवान सर्वश्री प्रदीप देशमुख .गणेश मोरे. अमोल सुसरे .मोहन जाधव. यांनी ही कारवाई केली पुढील तपास श्री आर के फुसे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव. एन के मावळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शेगाव हे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم