व्हाईस ऑफ मीडियाची खामगाव शहर कार्यकारणी जाहीर
शहर अध्यक्षपदी सिध्दांत उंबरकार तर सचिव पदी सुमित पवार, कार्याध्यक्षपदी निखिल देशमुख
खामगाव - पत्रकारांचा बुलंद आवाज असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची खामगाव शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये खामगाव शहर अध्यक्षपदी पत्रकार सिद्धांत उंबरकार तर कार्याध्यक्षपदी निखील देशमुख तसेच सरचिटणीस पदी सुमित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया ही पन्नास ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे . देशातील सतरा राज्यांत ही संघटना कार्यरत आहे. शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी स्थानिक विश्राम गृह येथे व्हॉइस ऑफ मीडियाची बैठक पार पडली. यावेळी बुलडाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे , कार्याध्यक्ष अरुण जैन, सरचिटणीस सिद्धार्थ आराख, जिल्हा संघटक दिनेश मुळे , जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप चव्हाण, तालुका संघटक साबीर अली, खामगाव तालुका अध्यक्ष मंगेश तोमर, सल्लागार नाना हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून संघटनेच्या आगामी योजनांबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. येत्या २५ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे आयोजित कार्यशाळेला पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. दरम्यान व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संपादक संदीप काळे , विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पदाधिकारी यांनी खामगाव शहर कार्यकारणी गठीत केली आहे. त्यामध्ये शहर अध्यक्ष पदी सिद्धांत उंबरकार, कार्याध्यक्षपदी निखिल देशमुख, उपाध्यक्ष पंकज ताठे, उपाध्यक्ष मुबारक खान, सरचिटणीस सुमित पवार, सह सचिव रुपेश कलंत्री, कोषाध्यक्ष महेंद्र बनसोड तर संघटक सुनील गुळवे, प्रसिध्दी प्रमुख सूरज बोराखडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
إرسال تعليق