दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे - जयश्री गीते
खामगाव (जनिपचार):- दिव्यांग व्यक्ती हा समाजातील अतिशय दुर्लक्षित व दुर्बल घटक असून दिव्यांग व्यक्तींनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे असे प्रतिपादन प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई गीते यांनी आयोजित 3 डिसेंबर दिव्यांग जागतिक दिवस कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या
स्थानिक पत्रकार भवन खामगाव येथे आयोजित जागतिक दिव्यांग दिवस व दिव्यांग मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा जिल्हा व खामगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रहार नेते गजानन भाऊ लोखंडकार प्रहार अपंग क्रांती जिल्हा कार्याध्यक्ष बेरोजा सर प्रहार अपंग क्रांती जिल्हा सचिव किशोर माहोकार जिल्हा संघटक प्रिती तिवारी दिव्यांग शक्तीचे संपादक मनोज नगर नाईक आदी मान्यवर होते या कार्यक्रमांमध्ये गरीब गरजू दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते अंतोदय शिधापत्रिका वाटप करण्यात आली आणि दिव्यांग योजनांची माहिती देण्यात आली जागतिक दिव्यांग दिनाचे चित्र साधून दिव्यांग तक्रार व मार्गदर्शन केंद्राची प्रहार अपंग क्रांती संस्थेकडून स्थापना करण्यात आली व दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दिव्यांगांचे हृदय सम्राट वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सदर कार्यक्रम मान मध्ये प्रामुख्याने खामगाव येथील पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका अध्यक्ष संजय पातोंड तालुका सचिव शैलाताई श्रीनाथ महिला तालुकाध्यक्ष चित्रलेखा परकाळे खामगाव शहराध्यक्ष वैशालीताई मस्के महिला तालुका सचिव वैशालीताई मुरेकर प्रहार दिव्यांग सेवक विजय श्रीनाथ अजय तराळे अलका ताई उडाळे कमलाबाई राहणे बळीराम कवडे विजय रणीत शेखर तायडे फिरोज खान दिलीप भोंगे आरवडे भाऊ पल्लवीताई टेकाळे भाऊ आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा सचिव किशोर माहोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रहार अपंग क्रांती खामगाव तालुका अध्यक्ष संजय पातोंड यांनी मांडले अशी माहिती प्रहार दिव्यांग सेवक विजय श्रीनाथ यांनी एका प्रसिद्धी पत्रकद्वारे दिली
إرسال تعليق