खबरदार!दारूबंदी विभाग ऍक्टिव्ह झालेत

 राज्य शुल्क उत्पादन विभागाचे शेगाव मनसगाव व पहुरपूरणा शिवारात छापे: दारू निर्माण करणारे अड्डे उध्वस्त



खामगाव जनोपचार न्यूज :- ग्रामपंचायत निवडणूक व थर्टी फर्स्ट च्या अनुषंगाने राज्य शुल्क विभाग ऍक्टिव्ह झाल्या असून गेल्या दोन दिवसात छापेमारी करून गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले आज 14 डिसेंबर रोजी शेगाव मनसगाव व पहूर पूर्ण शिवारात गावठी दारू निर्मि ती धंद्यांवर छापे टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख 82 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत राज्य उत्पादन शुल्क खामगाव विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर  अमरावती अधीक्षक साहेब

राज्य उत्पादन शुल्क, बुलडाणा श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरते वर्ष ३१ डिसेंबर तसेच ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने मौजे शेगांव व मनसगांव तसेच पहुरपुर्णा शिवारात जावुन अवैध देशी दारु वाहतुक व गावठीदारु निर्मीती धंदयावर छापे टाकुण सुरेश एकनाथ अंभोरे ,देवीदास रामदास सोळंके महिंद्र श्रीकृष्ण चराटे यांना दारुबंदी गुन्हयाचे मुददेमालासह तसेच दोन मोटरसायकलसह ताब्यात

घेतले व त्यांचेवर म. दा. कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार गुन्हे नोंद करण्यात आले यांचे ताब्येकब्जातुन दोन मोटर सायकलसह एकुण ११२८ लि. मोहा सडवा तसेच ६३ लि. गावठी दारु व देशी दारु ९ ली. असा एकुण १,८२,६२०/- रु. मुददेमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीत इसमांना जागेवरच समजपत्र व नोटीसची प्रत बजावुन मुक्त केले. सदर कार्यवाहीत आर. के. फुसे प्रभारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, खामगांव तसेच एन. के. मावळै दुय्यम निरीक्षक रा.उ. शु. शेगांव जवान  प्रदीप देशमुख, गणेश मोरे, अमोल सुसरे, मोहन जाधव जवान नि वाहनचालक स.दु.नि. एस आर एडस्कर यांचे पथकाने कार्यवाही केली. पुढील तपास

श्री आर. के. फुसे प्रभारी निरीक्षक रा.उ. शु. खामगांव तसेच श्री एन. के. मावळे दु.नि. शेगांव हे

करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم