दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रोटरी मतीमंद विद्यालय खामगांवचे सुयश
खामगाव जनोपचार:- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगांव मही व जिल्हा समाजकल्याण कार्यालय विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर निवासी अपंग व मूकबधिर विद्यालय देऊळगांव मही येथे दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी रोटरी मतीमंद विद्यालय खामगांवचे १३ विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
यामध्ये विजय श्रीकृष्ण शेजोळे नामक विद्यार्थ्याने वयोगट १२ ते १६ मध्ये ५० मीटर धावणे, गोळा फेक व लांब उडी या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु दिव्या नरेश पाटील हिने १०० मीटर धावणे व गोळा फेक या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु पायल कैलास शर्मा व कु अपर्णा बालकृष्ण भोन्डेकर यांनी इतर वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नितेश दयाराम तायडे याने १०० मीटर धावणे व गोळा फेक या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ८ ते १२ या वयोगटामध्ये कृष्णा सुर्यकांत देवताळू याने सॉफ्ट बॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर निर्भय सुभाष अंभोरे याने स्पॉट जंप स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. वसंत चोपडे या बहुविकलांग विद्यार्थ्याने ५० मीटर भरभर चालणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. अशा त-हेने रोटरी मतीमंद विद्यालय खामगांवने या स्पर्धेमध्ये ८ खेळांमध्ये प्रथम तर ३ खेळांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत एकुण ११ पदकांची लयलूट केली.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचे हस्ते सर्वांना मेडल्स व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व सह्भाग्यांचे कौतुक तर केलेच परंतु मतीमंद विद्यालय खामगांव यांचे विशेष कौतुक करत रोटरी क्लब अध्यक्ष, सचिव, संस्थाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले व उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात. रोटरी मतीमंद विद्यालय खामगांवच्या या यशामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
إرسال تعليق