Bhumi poojan

 खामगांव शहरातील

 4 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन

खामगांव - खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात शहराचा समग्र व शाश्व़त विकासाची घोडदोड सुरु असून शनिवार दि.17 डिसेंबर 2022 रोजी खामगांव शहरातील रु.4 कोटी रुपयांच्या कामांचा एकुण 31 कामांचा भुमिपूजन सोहळा आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न् होत आहे.

खामगांव शहरातील प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरु आहेत.  कोटयावधी रुपयांची कामे मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात खामगांव शहरात करण्यात आली आहे.  यत्र,तत्र सर्वत्र विकास काय असतो हे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी शहरताील विविध विकास कामांमधून करुन दाखवला आहे.  आज खामगांव शहर एक विकसीत शहर म्हणून नावा रुपाला आले आहे.  


शनिवार  दि.17 डिसेंबर 2022 रोजी शहरातील प्रभाग क्र.1 मधील खटी लेआऊट येथील नाली कामाचे भूमिपूजनापासून या भुमिपूजन सोहळयास सकाळी 10.00 वा सुरुवात होणार आहे.  यानंतर याच प्रभागातील अजून 6 कामांचा समावेश आहे. तसेच प्रभाग 5, प्रभाग 6, प्रभाग 8, प्रभाग 10, प्रभाग 11 व प्रभाग 12 मधील कामांचा समावेश आहे.   यामध्ये रस्ते नाल्या, पेव्ह़र ब्लॉक बसविणे, सभामंडप बांधकाम करणे, खुल्या जागेवर सभागृह विद्युतीकरणासह करणे, मुक्तीधाम स्मशानभूमी येथे पेव्ह़र ब्लॉक बसविणे, बगीचा विकसीत करणे,  यासह खामगांव शहरातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा टिळक मैदान व मस्तान चौक जोडणारा पुलाचे एक कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.

तरी उपरोक्त़ कामाच्या भूमिपूजन सोहळयास खामगांव शहरातील नागरीकांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येत उपस्थ‍ित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم