*उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा*
*हजारोच्या संख्येने उपस्थित रहा -प्रा.डॉ.अनिल अमलकार*
खामगाव - चिखली येथे २६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रा.डॉ.अनिल अमलकार यांनी केले आहे.
सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळ शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतःरस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. शिवसेनेच्या वतीने संपुर्ण राज्यभर पक्षसंगठण, शेतकरी, शेतमजुर कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मेळावे, बैठका आयोजित करण्यात येत आहेत. तर उध्दव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी चिखली येथील क्रिडा संकुल मैदान, बसस्थानका जवळ येथे दुपारी ३ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार असून शेतकरी बांधव, पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. तरी या मेळाव्या मध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव, शिवसेना पदाकिधारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रा.डॉ.अनिल अमलकार यांनी केले आहे.
खामगाव मध्ये प्लॉट पाहिजे तर बघा खालील व्हिडिओ
إرسال تعليق