दे राजा :- आताच हाती आलेल्या माहितीनुसार, विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी दोघेजण विहिरीत उतरले होते. परंतु, त्यापैकी एकजण गाळात रूतून मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आले आहे. पवन ताेताराम पिंपळे वय 30, रा. देऊळगावराजा असे या तरुणाचे नाव आहे. तर शिंगणे नावाचा अन्य एक 25 वर्षीय तरुण अत्यवस्थ आहे. गाडी शिकायच्या नादात हसतं खेळतं कुटुंब तर संपलेच, परंतु त्यांच्यासोबत आणखी एकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच या दुर्देवी घटनेत तिघांचा बळी गेला आहे. हे वृत्तलिहिपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरुच हाेते. विहिरीत प्रचंड पाणी असून, खाली गाळ साचलेला आहे. त्यामुळे माेटारी लावून पाणी उपसण्याचे काम सुरू हाेते.
देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नी स्वाती मुरकुट यांना कार चालवणे शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट हीदेखील बसलेली होती. दरम्यान, कार शिकवित चिखली रोडवर जात असताना, स्वाती यांनी ब्रेक दाबायचे तर अॅक्सिलेटर दाबले, त्यामुळे त्यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार वेगाने उसळी घेत सरळ रस्त्या शेजारील ७० फुट खोल विहिरीमध्ये कोसळली. या अपघातात अमोल मुरकुट हे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. अमोल मुरकुट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु हाेते. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न चालवले हाेते. क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात येत हाेती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अमोल मुरकुट सर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळणी (बुद्रुक), ता. भोकरदन, जिल्हा जालना येथे कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबीयांबाबत घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
إرسال تعليق