सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड येथे मिष्ठांनांचे वितरण "हा फेरा त्या नियतीचा ही साधी चक्कर नाही"मरणाचे उपाय लाखो जगण्याला उत्तर नाही,,
जनोपचार:--
उंद्री शहरापासून जवळच असलेल्या पळसखेड या गावात दीड एकर परिसरात डॉ.पालवे दांपत्य आपल्या सेवाभावातून आजमीतीस शेकडो निराधार,निराश्रीत, मनोरुग्णांना स्थायिक ठेवून त्यांच्यावर उपचार करीत त्यांना त्यांचं "सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या" रूपात हक्काचं घर दिल आहे पालवे दांपत्य हे कार्य समरसतेने करीत आहे आपल्या माणसांपासून दुरावलेल्या व रस्त्यावर वेदनादायी जीवन जगणाऱ्या अनेक जीवांना येथे आश्रय मिळत आहे दि.1ऑक्टोंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांच्या हस्ते दानदात्यांच्या माध्यमातून येथे मिष्ठांनांचे वितरण करण्यात आले, यावेळी डॉ.पालवे यांनी सेवा संकल्पच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत या "सेवायाज्ञात" सर्वांनी हातभार लावणे आज गरजेचे आहे असे प्रतिपादन केले। "सरली रात्र काळी आता नवी सकाळ आहे, पुसल्या दुर्भाग्याच्या रेषा तेजस्वी माझे भाळ आहे, "छळले ज्याने मला तो एक काळ होता, "माणुसकीच्या तज्ञ हाती आज माझा सांभाळ आहे।।
إرسال تعليق