अन्नकुटी परिवार व शिव नवयुक मंडळाच्या वतीने मोठी देवीचे मिरवणुकी दरम्यान जंगी स्वागत
अन्नकुटी परिवार व शिव नवयुक मंडळाच्या वतीने मिरवणुकीत सहभागी मंडळांसाठी महाप्रसादाचे आयोजन
खामगाव : जनोपचार - स्थानिक गांधी चौक येथील शिव नवयुवक मंडळाच्या वतीने मोठ्या देवीचे भव्यदिव्य स्वागत करण्यात येणार आहे.
20 ऑक्टोंबर रोजी आई जगदंबा शांती उत्सवाची सांगता होणार आहे यादरम्यान खामगाव शहरांमध्ये मोठ्या देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकी दरम्यान मोठ्या देवीचे शिव नवयुवक मंडळाच्या वतीने फटाक्याच्या आतिश बाजीत व फुलांच्या पाकळ्यांनी तसेच रस्त्यावर रांगोळी काढून मंडळाच्या वतीने देवीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व मंडळांच्या सदस्यांसाठी व भाविकांसाठी शेगाव रोड, लासुरा येथील अन्नकुटी परिवार व शिव नवयुक मंडळाच्या वतीने मेन रोडवरील नवलचं मिठूलाल ज्वेलर्स जवळ भक्तांसाठी महाप्रसाद म्हणून मसला भात वाटप होणार आहे. महाप्रसाद दुपारी २.३० वाजेपासून ते रात्री १० पर्यंत होणार आहे. तरी या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे
إرسال تعليق