खामगाव मध्ये अलविदा तनाव

 अलविदा तनाव’ हे ब्रह्माकुमारीजचे एक सकारात्मक सुत्र - बी. के. पूनम दिदी

काय म्हणाल्या पूनम दीदी पहा खालील लिंक वर

https://youtu.be/rSkeMG1vFII


खामगाव ह समाजात सद्यस्थितीत खूप समस्या आहेत. या समस्यांच्या चिंतेमुळे ताण-तणाव निर्माण होतो, याचे शरीरावर दुष्परिणाम होतात, तेव्हा भीतीपासून मुक्त होणे. तसेच मनोबल वाढविण्यासाठी ‘अलविदा तनाव’ हा ९ दिवसाचा कार्यक्रम आहे. ‘अलविदा तनाव’ हे ब्रह्माकुमारीजे एक सकारात्मक सुत्र आहे, असे प्रतिपादन तणावमुक्तिच्या प्रख्यात विशेषज्ञा बी.के. पुनम बहन, इंदूर यांनी येथे केले. येथे आज मंगळवार पासून आयोजित ९ दिवसीय ‘अलविदा तनाव’ कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन व व्याख्यात्या म्हणून त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
वास्तविक तणावा घालविण्यासाठी आध्यात्मिक जीवन शैलीचा कसा स्वीकार करावा तर विविध रोगांपासून व ताण-तणाव पासून कशी मुक्ती मिळवावी. हे या शिबिरात सांगून त्याची अनुभूती करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर गेल्या २३ वर्षांपासून अलविदा तणावचे हजारो कार्यक्रम झाले असून हजारो लोकांना फायदा झाल्याचेही त्या म्हणाल्यात, पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीत. सदर पत्रकार परिषदेचे आयोजन स्थानिक ब्रह्माकुमारीज वेंâद्रावर करण्यात आले होते. मंचावर अकोला झोनच्या संचालिका बी.के. रुख्मीणीदिदी, खामगावच्या वेंâद्र संचालिका बी.के. शवुंâतलादिदी उपस्थित होत्या. त्यांनीही उत्तरे दिलीत. यावेळी बी.के. प्रमिलादिदी तेल्हारा, बी.के. सुषमादिदी खामगाव उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण खंडारे सर यांनी केले.
स्थानिक मुक्तानंद नगर दि. १ ते ९ पर्यंत आयोजित ‘अलविदा तनाव’ उपक्रमात खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

أحدث أقدم